

सन्माननीय मतदार माता , बंधू , भगिनी
पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रदीर्घ कालावधीनंतर सार्वत्रिक निवडणूक अल्प कालावधीत जाहीर होणार आहे संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये निवडणूकीचे व प्रचाराचे पडघम वाजू लागले आहे
मी सौ. निलम कुंडलिक लांडगे वय वर्षे ४४ राहणार उंबऱ्या गणपती चौक दिघी रोड भोसरी
आपली स्नेही ,कार्यकर्ती आपले हितचिंतक म्हणून आपणा समोर प्रामाणिकपणे या निवेदनाद्वारे जोडू इच्छिते मी भारतीय जनता पार्टी या पक्षाची कार्यकर्ती असून भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार श्री महेश दादा किसनराव लांडगे यांच्या कार्याने प्रेरित होऊन आपल्या प्रभागातुन जनतेच्या सेवेसाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून आपणापुढे येत आहे.
मी आत्तापर्यंत आपले आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या २०१९ पासून आमदारकीच्या निवडणुकीत संपुर्ण विधानसभा क्षेत्रात प्रचाराची सर्वात मोठी धुरा सांभाळली आहे.घर टु घर,वाड्या वस्त्या व सोसायटी या ठिकाणी समक्ष गाठीभेटी घेऊन प्रचार केला आहे. मी स्वतः २०१७ ची मनपा निवडणूक हिंदुत्ववादी शिवसेनेच्या तिकिटावर आपले भोसरी प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक लढवली असून माझा जरी पराभव झाला असला तरी ना उमेद न होता, मी जोमाने समाजकार्य चालू ठेवले महिलांच्या अडीअडचणी सोडवल्या महिलांच्या संरक्षणासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने तनिष्का महिला मंचांची निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकले .
गरीब, वंचित,कष्टकरी, घरकाम करणाऱ्या महिलांना एकत्र करुन त्यांना रेशनकार्ड काढुन दिले त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले व शाळेत प्रवेश मिळवून दिला गरिब मुलं व मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. आपला संपूर्ण पिंपरी चिंचवड मधील व हद्दीलगत असणाऱ्या अनाथ आश्रम, वृधाश्रम यांना समक्ष भेट देऊन त्यांना धान्य, कपडे व आर्थिक मदत केली.
सन २०२० मधील करोना महामारीच्या काळात भटक्या, बेघर, पुलाखाली राहणाऱ्या,बसस्टॉपवर राहणाऱ्या गरीब कुटुंबाना मी व माझे पती व कुंडलिक शेठ लांडगे युवामंच समक्ष . या लोकांना दोन वेळचे जेवण अविरतपणे पुरवले .
आपल्या प्रभाग क्रमांक ५ मधील व संपूर्ण पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी मी कार्यरत राहु इच्छिते . भारतीय जनता पार्टी व विधमान आमदार मा श्री महेश दादा किसन लांडगे यांच्या कृपेने व आशीर्वादानी मी प्रभाग क्रमांक ५ मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून उभे राहू इच्छिते .
तरी माझ्या प्रमाणिक समाजकार्यासाठी आपल्या परिसरातील सुज्ञ नागरिक तरुण वर्ग, माता, भगिनी व जेष्ठांचे मला सहकार्य व पाठबळ मिळावे ही मी आपणाकडून आशा बाळगते.
आपली कृपाभिलषी
सौ. निलम कुंडलिक लांडगे
इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक ५









